Tuesday 6 January 2015

समलैंगिकता नैसर्गिक आहे ?



पुरूष समलिंगीला इंग्रजीत गे (Gay) आणि महिला समलिंगींना लेस्बियन (lesbian) असे म्हणतात. समलैंगिकता अगदी प्राचीन काळापासून सर्व देशांत आहे. पण आत्ता खुलेपणाने ती जितकी समोर येतेय तेवढी ती कधीच नव्हती. आता तर अनेक देशांनी त्याला कायदेशीर मान्यता दिली आहे. काही देश मात्र याच्या कठोर विरोधात आहेत.
समलैंगिकता नैसर्गिक आहे कि नाही हा नेहमी वादाचा मुद्दा राहिला आहे . हे अनैसर्गिक आहे ,हे फक्त शारीरिक सुखासाठी आहे ,पाप आहे ,ह्याला पृथ्वीवर कुठलाही थारा नाही वगरे वगरे विधानं आपण ऐकत असतो .ह्या मागची कारणं म्हणजे लोकांच अज्ञान ,अपुरी माहिती आणि भीती.

आपण असही म्हणू शकतो कि जी घडत आहे ते नैसर्गिक आहे .जर आपण असे मानले कि एखादी बाह्य अनैसर्गिक शक्ती आपल्या पैकी काहींना हाताळत आहे ,किंवा वेगळं काही शिकवत आहे तेव्हा एखादी गोष्ट अनैसर्गिक आहे, मग एखद्या व्य्यक्तीविषयी वाटणारे आकर्षण अनैसर्गिक कशी काय होऊ शकते ? ते तर कोणी शिकवत नाही ,सांगत नाही . बरोबर ना ?
अर्थात काही लोकांचा दाव्या प्रमाणे हे सगळं "मिडिया" मुळे ,सैताना मुळे होतं , नैसर्गिक समलैंगिक लोकही हे खरं मानतात . आणि संपूर्ण आयुष्य संभ्रमात आणि वाळीत टाकल्या प्रमाणे काढतात किंवा स्वतःला "सामन्य "किंवा नैसर्गिक बनवण्याच्या प्रयत्नात हरवून जातात.

निसर्गत: प्रत्येक पुरुषात थोडा स्त्रीचा तर प्रत्येक स्त्रीत थोडा पुरुषाचा अंश असतोच त्यामुळेच मैत्री, स्नेह या सामाजिक भावना निर्माण होतात.असा कोणताच पुरूष नसतो, ज्यात स्त्रैण गुण नाही. त्याचवेळी अशी कोणतीच स्त्री शंभर टक्के स्त्री नसते.

माणसांमध्ये जशी समलैंगिकता आणि उभयलैंगिकता आढळून येते तशीच ती चिंपांझी, गोरिला, हरीण, जिराफ, हत्ती, शेळी, सिंह, चित्ता, माकड ,लंगूर, मॅलर्ड बदक, फ्लेमिंगो,डॉल्फिन , पाइड किंग फिशर यांसारख्या १,५०० + जातींच्या पशू-पक्ष्यांमध्येही आढळत असल्याचं शास्त्रज्ञांना दिसलेलं आहे. त्यामुळे भिन्न लैंगिकतेइतकीच काहींच्या बाबतीत समलैंगिकताही ‘नैसर्गिक’ आहे, हे आता विज्ञानाने मान्य केलेलं आहे.

पूर्वीच्या काळी समलिंगी वर्तन हे पाप समजलं जात होतं. समलिंगी वर्तन त्यामुळे कायद्याने गुन्हा समजला जात होता. (अजूनही काही देशात समलिंगी वर्तन हा गुन्हा समजला जातो.) १८ व्या शतकात समलैंगिकता ही ‘विकृती’ असल्याचं मानलं गेल्यामुळे ही मानसिकता ‘बदलली’ पाहिजे असं सर्व डॉक्टरांचं मत होतं. समलैंगिकांचा त्यामुळे लैंगिक कल बदलण्यासाठी समलैंगिकांवर शस्त्रक्रिया, औषधं, शॉक थेरपी, मोहिनी विद्या, काऊन्सेलिंग यांसारखे विविध उपचारांचे मार्ग अवलंबले गेले. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे कालांतराने मानसोपचारतज्ज्ञांनी हे मानायला सुरुवात केली की, ‘लैंगिक कल’ बदलता येत नाही.

आज ‘अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिस्ट असोसिएशन’ आणि ‘वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ समलिंगी असणं, हे आजारपण मानत नाहीत.
आपल्याकडच्या मानसोपचारतज्ज्ञांचा याविषयी काय दृष्टिकोन आहे हे पाहण्यासाठी पुण्याचे सुप्रसिद्ध बाल-मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांना समलैंगिकता ही मनोविकृती आहे का, हा प्रश्न विचारला. त्यावर डॉ. भूषण शुक्ल म्हणाले, ‘‘अजिबातच नाही. समलैंगिकता ही अजिबातच मनोविकृती नाही. याबाबत आज मानसशास्त्राचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आणि ठाम आहे. मानवी लैंगिकतेचा समलैंगिकता हा वेगळा ‘आयाम’ आहे. इतकंच, समलैंगिकता हा जिथे मानसिक आजारच नाही, तिथे उपचार तरी कशावर करणार?’’

थोडक्यात, निसर्गत: समलिंगी संबंधांची भावना निर्माण होते अशा व्यक्तींना दोष देणे आपला मुर्खपणा आहे. त्यांनाही सन्मानाने जगायचा, आपले हक्क अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे व तो नाकारणे अमानवी आहे.



1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete