Monday 4 February 2019

‘समलैंगिकता हा आजार नाही’ भारतीय मानसोपचार तज्ज्ञांची जाहीर भूमिका

आपण समलिंगी आहोत असं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पालकांना सांगते तेव्हा अनेकदा असं घडतं की ते त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जातात, पण हा मानसिक आजार नाही, अशी भूमिका भारतातल्या मानसोपचार तज्ज्ञांच्या सर्वोच्च संस्थेनं स्पष्ट केली आहे.

गेल्या 30 ते 40 वर्षांत गोळा केलेल्या पुराव्यांवरून हेच सिद्ध होतं की समलैंगिकतेची आजार म्हणून गणना करण्यासाठी कोणताही शास्त्रीय आधार नाही." डॉ. भिडे सांगतात.
"समलैंगिकता हा आजार आहे अशी Indian Psychiatric Society (IPS) ची कधीच भूमिका नव्हती." डॉ. अजित भिडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. डॉ. भिडेंच्या व्हीडिओ मेसेजनंतर IPS ने पहिल्यांदाच या विषयावर भूमिका घेतली आहे असाच अनेक लोकांचा समज झाला आहे.

2014 साली IPSच्या तत्कालीन अध्यक्ष डॉ. इंदिरा शर्मा यांनी 'समलैंगिकता अनैसर्गिक आहे' असं विधान केलं होतं ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर संस्थेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली होती.

"'समलैंगिकता हा आजार नाही'
पण याबाबत बोलताना त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "IPSचे माजी अध्यक्ष डॉ. मोहनदास यांनी आजच मला फोन करून सांगितलं की त्यांनीही त्यांच्या कार्यकाळात उघडपणे अशी भूमिका घेतली होती. अनेकांना याबाबत कल्पनाच नव्हती."

याबाबत आपलाच अनुभव सांगताना डॉ. भिडे म्हणाले, "माझ्याकडे अनेकदा असे पालक आपल्या मुलांना घेऊन आले आहेत. मग मला त्या पालकांचंच समुपदेशन करावं लागलं. पालक येतात या उद्देशाने की मुलाचं काउन्सेलिंग होईल. पण खरं तर त्यांनाच त्या समुपदेशनाची गरज असते. आपल्या मुलाला/मुलीला आहे तसं स्वीकारा हे त्यांना पटवून देण्यात खूप वेळ लागतो."

"समलैंगिकता हा आजार नाही. इथून पुढे Indian Psychiatric Society त्याला आजार मानणार नाही," असं सांगत, मानसोपचार तज्ज्ञांच्या भारतातल्या सर्वोच्च संस्थेने एक मोठं पाऊल उचललं आहे.

वैद्यकीय क्षेत्रातून हा पाठिंबा मिळाल्यामुळे LGBTQI कार्यकर्त्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. Indian Psychiatric Societyचे अध्यक्ष डॉ. अजित भिडे यांनी एका व्हीडिओ मेसेजद्वारे ही भूमिका स्पष्ट केली

सगळेच मानसोपचारतज्ज्ञ याच्याशी सहमत होतील का?
"बहुतांश मानसोपचारतज्ज्ञ याच विचाराचे आहेत. समलैंगिकता हा आजार नाही यावर त्यांचा विश्वास आहे. पण अर्थात काहींचा अजूनही यावर विश्वास नाही. हे एका झटक्यात स्वीकारलं जाणार नाही. त्याला वेळ लागेल. पण ते होईल." डॉ. भिडे पुढे सांगतात.

इतर देशांचेही या बाबतीत समान अनुभव आहेत या गोष्टीकडे लक्ष वेधताना डॉ. भिडे म्हणाले की, "अमेरिकन सायकॅट्रिक सोसायटीने जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासाठीही ही गोष्ट सोपी नव्हती. त्यांना यावर मतदान घ्यावं लागलं आणि त्यातही 1/3 सभासदांनी या भूमिकेचा विरोधच केला होता."

No comments:

Post a Comment