Thursday 26 September 2013

गे प्रेम कथा- १

दोन पुरुष खरोखर प्रेम करू शकतात... ?
हा प्रश्न खूप जणांना पडतो , कारण लहानपणा पासून फक्त आपण "क्रॉस जेंडर " समाजात वावरतो.
आणि अश्यातच तुम्हाला एक मुलगा असून एक मुलगा आवडतो तर ह्यात काहीही वाईट किंवा अनैसर्गिक अस काही नाही.
प्रेम हे सहज शक्य आहे . आणि प्रेम हे सहज आणि सरळच पाहिजे.

मला नेहमी मुलाचं आकर्षण असायचं , केवळ सेक्स साठी नव्हे , सेक्स नेहमी नंतरची गोष्ट असते आणि असावी असे मला वाटते , आज काल सेक्स सिकर मुळेच गे समाज काही अंशी बदनाम आहे.असो.. तर हे माझं आकर्षण सेक्स पुरते मर्यादित नव्हते , कोणाबरोबर आयुष्य घालवता यावे असे वाटायचे, आपला पण बॉयफ्रेंड असावा.. मना पासून एकमेकांवर प्रेम करावे बस ..

पण ही इच्चा मनातच होती खूप वर्ष ,,, कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत , आणि एक दिवशी "त्याची" एन्ट्री झाली माझ्या आयुष्यात ,
लायब्ररी मध्ये बसलो होतो , दुपारची वेळ होती तरी गर्दी भरपूर होती, माझं आपलं सबमिशन च काम चालू होत.. का हे बोरिंग काम असत आपल्याला ? नंतर रद्दीच करणार ह्या जरनल ची ? मग कश्याला हा आंत बघता मुलांचा ,,, असा विचार करत रखडत होतो , आजूबाजूला मित्र येऊन जात होते माझं कोणाकडे लक्ष पण नाही ,
"ग्रंथालयात शांतता पाळा " हा फलक फक्त ग्रंथपालालाच होता जणू , कोणी गाणी म्हणतय काय कोणी मोठमोठ्याने हसत काय . त्यांतच कोणीतरी भांडत होत, कोणी डेस्क बडवत होत . मी आपला शहाण्या मुला सारख रखडत होतो.  मगासपासून कोणीतरी भांडत होतं . पण त्यामुळे माझं लक्ष्य नाही गेलं , तर भांडण इंग्लिश मराठीतून चालू होत म्हणून आश्यर्च वाटलं  . अर्थात फोरेनर भरपूर असायचे कॉलेज मध्ये पण भांडण पहिल्यांदा एकू येत होते.
मी वळून बघितलं तर "त्याची" पाठमोरी आकृती वरून काहीसा अंदाज बांधला, साधारण माझ्याच वयाचा , पण माझ्या पेक्षा खूप फिट आणि दणकट शरीर  ,, लायब्ररी वाल्याशी भांडत होता , लायब्ररी वाल्याला काही इंग्लिश झेपत नव्हत , आणि इतरांना काही घेण देण नव्हत..
मी उठून लायब्ररी वाल्याला विचारलं काय प्रोब्लेम आहे ,त्या वरून कळले की ह्या फोरेनरनी दोन पुस्तक हरवली आणि कबुल करत नाही , आणि म्हणतोय की दिली आणि आता त्याला दंड करयचा आहे.

मी त्याझ्या कडे वळून बघितलं , खूप त्रासदायक चेहरा असला तरी दिसयला खूप छान वाटला बघताक्षणी... त्याने घातलेल्या टी शर्ट मधून त्याची सेक्सी पिळदार बॉडी दिसत होती , रोज भरपूर वेळ जिम मध्ये घालवत आसेल , एकूणच काय मला त्याच्या विषयी आकर्षण वाटले.
मी माझ्या परीने समजावून सांगितले  दोघांना , शेवटी दंडच्या ऐवजी दिपोझीट मधून कापून घ्या असं सुचवल आणि वाद मिटवला , तो thanks म्हणून निघून गेला आणि मी पुन्हा बोरिंग काम सुरु केलं.

त्याचा नंतर का कोण जाने त्याचाच विचार मनात यायचा त्याच नाव पण माहित नाही की तो कुठल्या देशाचा होता हेही नाही माहित, दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यावर मी बाहेर आलो , तिथे तो उभा होता , जणू माझीच वाट पाहत होता,
मला बघून तो हसला आणि मी ही हसलो , जवळ आला आणि हात मिळवला, पुन्हा कालच्या साठी आभार मानले ,
त्याची ओळख करून घेतली त्याचे नाव Franklin , जर्मनी  वरून इथे PHD करायला आला होता. दिसायला सुंदर आणि गोरा गोरा , हलके सोनेरी केस , सुंदर स्माईल , बोलायला ही खूप छान  , मला तो आवडला होता,
माझ्याशी मैत्री कर मला इंडियात मित्र नाही आस म्हणला तो , मी म्हणलो मला पण कोणी फोरेनेर मित्र नाहीये ,मला आवडेल.
त्याला घेऊन मिसळ पाव खायला गेलो. एक घास खाल्ला आणि दोन तीन ग्लास पाणी पिलं , म्हणाला  "किती तिखट आहे हे" , मी म्हणालो "ओये मिसळ पावला नाव नाही ठेवायचं मी पुणेकर आहे खपवून नाही घेणार" , आणि दोघे हसलो ,त्याने नुसता पावच खाल्ला.
आमच्यात मोकळीक खूप लवकर आली होती . अर्थात आमचे संभाषण इंग्लिश मध्येच होत होते.त्याचा स्वभाव आवडला  एकमेकांच्या बाबतीत सर्व जरुरी माहिती घेत होतो , फोन नंबर घेतले . उद्या पुन्हा भेटू असं म्हणून निघालो .
अशी ही पहिली भेट आमची ...
रोज sms चालू झाले, एक मेकांना सर्व काही सांगू लागलो , रात्री दोन पर्यंत चाटींग करायचो , कधी भांडण कधी रुसवे फुगवे , मग एक मेकांना पुन्हा पटवायचं , गिफ्ट द्यायचं ,,, माझ्या घरी यायचा ,घरच्यांनाही त्याचा स्वभाव आवडला
असं ३ महिने चालू होत , एक मेकांना सतत एकत्र राहावे असे वाटू लागले, ह्या तीन महिन्यात दोघानाही माहित नव्हते की गे आहे , आणि हीच खूप सुंदर बाजू होती ह्या नात्याची , तीन महिन्य नंतर मिस यु चे मेसेज सुरु झाले , आणि <3 हे चिन्ह प्रत्येक मेसेज मध्ये असायचे, २४ तास  सतत आमचे sms नाहीतर फोन असायचे , आणि हो मी प्रेमात पडलो होतो त्याच्या ..तश्या आमच्या आवडी निवडी फार वेगवेगळ्या होत्या आणि आम्ही खूप भांडायचो त्या वरून  , पण म्हणतात ना opposite attracts :)
पण माहित नवते तो काय म्हणेल . त्याच्या मनांतले काही कळेना ... तो पण गे असेल का नाही  ?
आमची मैत्री खुपच पक्की झाली , तो मला नेहमी हसवायचा , मला आवडेल तेच करयचा , हो भांडण पण करायचा खूप पण नंतर पुन्हा मला मनवायचा ... तीन महिन्यात आयुष्य बदलून गेले , त्याच्या विषयी कमालीच आकर्षण वाटू लागले, सतत त्याचा विचार आणि त्याचा सहवास, खूप वेगळा आहे तो , मला समजून घेणारा , माझ्या साठी सर्व काही सोडून अर्ध्या रात्रीत फक्त भेटायला यायचा ,,,
काही दिवसांनतर रिझल्ट लागल्या नंतर  ,दोघेही पास झालो चांगल्या मार्काने ,,, आम्ही  मिठी मारली पहिल्यांदा , ही मिठी साधी नव्हती , १० मिनिटं आम्ही मिठी मारून होतो , सोडवत नव्हते त्याला , खूप सुंदर अनुभव , मिठी मारली तेव्हा त्याने पाठीवर हात फिरवला, त्याच्या छातीवर तसच राहावे वाटायचे , त्याचा गंध माझ्या शरीरीरात पसरत होता  , मी त्याच्याशी एकरूप होत आहे असे वाटू लागले.  त्याला किस करावसे वाटत होते .
मला घड्याळ घेऊन आला होता . स्वताच्या हाताने मला घातल , आणि माझा हात हातात घेऊन थांबला. मला खूप वेगळं वाटत होत आज . का कोण जाने . मिठीत अशी काय जादू असते ?

आता रिझल्ट नंतर त्याला दोन महिने जर्मनीला घरी  जावे लागणार होते, मला फार रडायला आलं , मी नकळत म्हणून गेलो " frank dont make me to stay without you ,better you kill me n go " हे ऐकल्या वर त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला, त्याच्या ही डोळ्यात पाणी आलं ,
दिवसभर त्याने मला आवडणाऱ्या ठिकाणी फिरवल आणि मला आवडणारे पदार्थ खाऊ घातले , मला समजावल की दोन महिन्यात पुन्हा येणारच आहे , मी कसाबस तयार झालो , पण मनातून खूप वाईट वाटत होत .
का कोणाच्या मध्ये इतका जीव रुतला जातो , का कोणीतरी आपलं सर्वस्व होऊन जात , का आपण इतके गुंतत जातो ?

तो जाईपर्यंत मला त्याला काहीतरी गुड बाय गिफ्ट द्यायचं होत , मनातून भीती वाटत होती की हा परत नाही आला तर ? मी ठरवल की जे होईल ते होईल , माझं प्रेम आहे हे त्याला सांगायचं , नाहीतर आयुष्भर मनातच राहून जायचं,,,
मी पत्र लिहिलं , त्यात माझ्या साऱ्या भावना लिहिल्या , पत्र लिहिताना खूप रडलो , असं वाटलं आता परत कधी भेटणार नाही ह्याला.
पत्रात पहिल्या भेटी पासून पहिल्या मिठी पर्यंत माझ्या सर्व भावना लिहिल्या , लिहिले की माझं तुझ्यावर खर खूर प्रेम आहे , तु काय विचार करतोस मला माहित नाही , मला ह्या नात्याला काही नाव द्यायचं नाहीये पण तुज्या वर आयुष्यभर प्रेम करायचे आहे , तुज्या बरोबरच आयुष्य घालवायच आहे ...
अजून बरच काही लिहिलं ,, पत्र वाचून मलाही रडायला आलं , पण मन मोकळ झालं , मनातील भावना मोकळ्या झाल्या , आता फक्त वाट पाहायची त्याच्या उत्तराची...
विमानतळावर मिठी मारली , त्याला म्हणालो  हे पत्र तिकडे गेल्यावरच वाचायचं , आणि काहीही झालं तरी मैत्री अशीच ठेवशील ह्याचं वचन दे... , त्याने वचन दिलं , तो गेला .
तो पोह्चायची बातमीची वाट बघत होतो,,

काही तासांनी मिस कॉल आला जर्मिनी वरून , त्याने सांगितल होत मिस कॉल  देईन कुणाच्या तरी फोन वरून आणि नवीन नंबर घेतल्यावर कॉल करेल ,
रात्रभर मी वाट पाहून झोपलो , सकाळी ५ वाजता जाग आली आणि धड धड वाढली , ४ मिस कॉल  होते आणि दोन मेसेज

पहिला मेसेज  " frank here , save my number my dear , missing you a lot , my mind is with you "
हे वाचून रडायला आलं , खूप आठवण येत होती , दुसरा मेसेज उघडलाच नव्हता ,

दुसरा मेसेज माझं आयुष्य बदलून टाकणारा होता, आणि मी रडायला १५-२० मिनिटं घालवली ह्याचा आजही पश्याताप होतोय
तो मेसेज होता  " read letter just now, calling you , how can you sleep without talking to your new "boyfreind " ;) of course i love you my baby ,,, call me now m waiting "
आनंदअश्रू असतात हे एकल होत आज आनंदाने ओक्साबोक्शी रडलो ...  खूप खूप आनंद झाला , इतका आनंद घाय्यची सवयच नवती,,,,
त्याला फोन लावला, आणि काही बोललोच नाही , दोघेही रडत होतो ..किती तरी वेळ ,  मी म्हणलो कधी नव्हे इतकी गरज आहे तुझी आणि तु नाही , कसे काढू दोन महिने सांग मला...
आता आम्ही बॉयफ्रेंड झालो होतो एक मेकांचे .... प्रेम तर करत होतो आता  official  lover झालो होतो.
रोज आमचे प्रेम संवाद सुरु झाले. .  मिस यु पर्यंत थांबलेले संवाद आता दहा दहा वेळा आय लव्ह यु म्हणत संपायचे. .

क्रमशः































2 comments: